ताईंना सांगा… पदर… नीट घ्या…!
रात्र बरीच झाली होती… बाईकवरून मी आपल्या घरी जायला निघालो… काही दिवसांपूर्वीच मला ही नवी नोकरी लागली होती… कधी दिवसपाळी तर कधी रात्रपाळी करून मी खूपच थकून जात असे. ऑफिसमधून बाहेर पडलो त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता. नाईट शिफ्ट संपलेले बरेच लोक मला आता मुख्य रस्त्याच्या दिशेने जाताना दिसत होते. मीही त्यांच्या सोबत मुख्य रस्त्यापर्यंत …